धोंडराईत अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त लावलेले महापुरुषाचे बॅनर अज्ञाताने फाडले.
त्या समाजकंटकास तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी.

बीड (प्रतिनिधी) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती महाराष्ट्रात मोठ्या उत्साही व आनंदी वातावरण साजरी करण्यात आली.
गेवराई तालुक्यातील धोंडराई मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञात आणि फाडल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत, महापुरुषांचा अपमान कधापीही सहन होणार नाही, बॅनर पाडणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात यावी त्या समाजकंटकाचा पोलीस प्रशासनाने तत्काळ शोधून लावून अटक करण्यात यावी अशी मागणी केली.
दि 4/8/25 रोजी गावात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त बॅनर लावलेले असता बॅनर वरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व टीपु सुलतान या दोन महापुरुषांचे फोटो अज्ञात व्यक्तीने गावात फाडुन टाकल्याने गावात तीव्र संतापाची लाट पसरली असुन गावात तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी एकात्मतेचा संदेश देनारे बॅनर लावलेले आहे त्या मध्ये विविध महापुरुषांचे फोटो लावण्यात आले होते रात्रीच्या सुमारास अज्ञात काही जातीवादी समाजकंटकांनी जाणीवपूर्वक डॉ.बाबासाहेब आंबेडकर व टीपु सुलतान यांचे फोटो फाडुन टाकले असता सकाळी ग्रामस्थांच्या नजरेस आले असता गावात संतापाची लाट पसरली आहे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोकानी गावात ठीय्या माडंला असुन जो पर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत गावात निषेध यलगार चालुच राहील असा पवित्रा घेतला आहे आरोपीला अटक करून योग्य ते शासन करून कडक कार्यवाही करण्यात यावी कारण हा विषय बॅनर फाडण्यापुरता नसुन समाजाच्या भावना दुखवन्याचा घृणास्पद प्रकार आहे आशा मातेफीरू समाजकंटकास पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करावी अशी समाजाच्या वतीने मागणी करण्यात येत आहेत.