
https://www.facebook.com/share/v/1Ayykb1A4N/
बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून दादागिरी,मारामारी, खुनाच्या घटनेत वाढ झाली असून पोलिस प्रशासन अश्या घटनांना आळा घालण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.मारहाण करताणाचे फोटो,व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण केली जात आहे.
उमेश संजिवन कराड वय 30 वर्ष व्यवसाय हाँटेल निसर्ग मालक / शेती रा. कौडगाव साबळा ता. परळी जि.बीड
परळी येथील साधूला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.
दिनांक 08/09/2025 रोजी संध्याकळी 09.30 वा. सूमारास बीड ते परळी रोड निसर्ग हॉटेल मधून रुद्रा महाराज हे पाणी पिवुन बाहेर पडत असताना एकाने रुद्रा महाराज यांचे सोबत हुज्जत घालुन त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करत त्यांच्या हातातील मोबाईलवर दगड मारुन नुकसान केले व त्यांना ढकलुन देवुन ते खाली पडुन त्यांचे हाताला जखम झाली.
उमेश संजिवन कराड वय 30 वर्ष व्यवसाय हाँटेल निसर्ग मालक / शेती रा. कौडगाव साबळा ता. परळी जि.बीड यांच्या फिर्यादीवरून आरोपी- दिपक पंडीत रा. जायकवाडी कॅम्प पिंपळगाव ता. परळी जि.बीड फिर्यादीची त्याचेविरुध्द तक्रार दिली असून पो स्टे सिरसाळा गुरनं 215/2025 कलम 118(1), 115(2),352,324 (4) भा.न्या, सं 2023 प्रमाणे सदर दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सं.पो.नि. सो यांचे आदेशाने पुढील तपास पो.ह.1121 देशमुख करत आहेत.