जिल्हा रुग्णालयात मयताच्या अंगावरील सोन चोरले !
"मढयावरचे लोणी खाणारे ते कोण" ? केक वडमारे

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला असून आता तर मयताच्या अंगावरील सोन चोरीला गेले गेल्याने ICU विभाग वादात सापडला आहे.
मागील महिन्यात पेठ बीड भागातील एक महिला भाजल्याने तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु कर्तव्यावर नेमणूक असलेले डॉक्टर हजर नसल्याने कुटुंब व सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल वरपे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या विरोधात आंदोलन करून यांची तक्रार जिल्हाधिकारी व मंत्र्यांकडे तक्रार केली होती.
तसेच एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधील पैसे चोरल्याचा आरोप महिलेला केला होता. यामुळे जिल्हा रुग्णालयातील चोरीच्या प्रमाणात आळा घालण्यात यावा अशी मागणी होत आहे.
सुमन जगन्नाथ घीगे वय 65 वर्ष राहणार सोनगाव ता.जि.बीड या आजारी असल्याने त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभाग ICU मध्ये उपचार सुरू करण्यात आले होते,परंतु त्यांचे निधन झाले.मयताच्या अंगावरील सोन्याचे 50 मणी व डोरले चोरी झाल्याचे मुलाच्या लक्षात आल्याने त्याने ICU मधील कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असे त्यांनी उडवडीची उत्तरे दिल्याने याची माहिती सामाजिक कार्यकर्ते वडमारे यांना दिली. त्यावर भिगे व सामाजिक कार्यकर्ते वडमारे यांनी ICU कक्षा बाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले यावेळी बीड जिल्हा शल्यचिकित्सक राऊत यांनी ICU कक्षामध्ये येऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले. परंतु मयताच्या अंगावरील सोने चोरने कितपत योग्य आहे, शासकीय रुग्णालय आहे की चोरांचा अड्डा ?असा सवाल सामाजिक कार्यकर्ते के.के.वडमारे यांनी केला आहे.मयताच्या अंगावरील सोन चोरणारावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी घिगे कुटुंबीय व वडमारे यांनी बीड जिल्हा शल्य चिकित्सक राऊत यांच्याकडे केली आहे.