ब्रेकिंग न्यूज

संस्था चालकाच्या छळाला कंटाळून तरुणाने घेतला गळफास !

परळी पोलिस ठाण्यात संस्थाचालकावर गुन्हा दाखल.

बीड(प्रतिनिधी)बीड परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी श्रीनाथ गोविंद गिते (वय २५) या तरुणाने शुक्रवारी (२२ऑगस्ट २०२५) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो नुकताच वसंतनगर येथील आश्रमशाळेत अनुकंपा तत्त्वावर ‘सेवक’ म्हणून रुजू झाला होता. यापूर्वी तो केज येथील एका निवासी शाळेत बारा वर्षांपासून चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होता, मात्र त्याला कायम करण्यात आले नव्हते.

परंतु आईने पाठपुरावा करत व सामाजिक कार्यकर्ते टायगर ग्रुप जिल्हा अध्यक्ष राकेश जाधव यांनी समाज कल्याण अधिकारी यांची भेट घेऊन संस्थेवर रुजू करून घेण्यात यावी अशी मागणी केली होती,अन्यथा त्या संस्थाचालका विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही टायगर ग्रुप ने दिला होता.

 वसंतनगर येथील आश्रम शाळेत रुजू झाल्यापासून त्यास प्रचंड मानसिक त्रास व पगार न काढण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचे त्याच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा येथील आश्रम शाळेचे संस्थाचालक यांनी त्यास जाणून बुजून काम करताना त्रास देणे, हीन वागणूक देणे, इतर शिक्षक व कर्मचाऱ्यासमोर आपमानास्पद वागणूक देणे, तू केजच्या संस्थाचालकाबरोबर भांडण का केलेस तुझा पगार निघू देणार नाही अशा सातत्याने धमक्या दिल्या. त्यामुळे मयत श्रीनाथ गीते हा सतत तणावातच राहत आला. या सर्व मानसिक तणावातूनच त्याने अखेर राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येस आश्रमशाळा संस्थाचालक उद्धव कराड व संजय राठोड हे संस्थाचालक जबाबदार असल्याचे फिर्यादीत त्म्हटले आहे. या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात या दोन संस्था चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.

मयत श्रीनाथच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनुसार, केज येथील सानेगुरुजी निवासी विद्यालयाचे संस्थाचालक उद्धव माणिक कराड आणि परळी तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळा वसंतनगर तांडाचे संस्थाचालक संजय परशुराम राठोड यांनी श्रीनाथला नोकरी कायम करण्यासाठी किंवा अनुकंपा तत्त्वावर नोकरी न देण्यासाठी मानसिक त्रास आणि आर्थिक मागणी केली होती. या सततच्या मानसिक छळामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे श्रीनाथने हे टोकाचे पाऊल उचलले, असे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले.

श्रीनाथची आई गंभीर आजाराने त्रस्त असून त्याचे वडीलही शैक्षणिक संस्थेत नोकरी करत असतानाच मृत पावले होते. त्यामुळे कुटुंबाचा संपूर्ण भार त्याच्यावरच होता.

संस्थाचालकांविरुद्ध गुन्हा दाखल या प्रकरणी, मयत तरुणाची आई सुनीता गोविंद गिते यांनी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे उध्दव माणिक कराड आणि संजय परशुराम राठोड या दोन्ही संस्थाचालकांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 108, 351(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निमोणे करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button