
बीड(प्रतिनिधी)बीड मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी आता मुंबई गाठणार आहेत. आज मांजरसुंबा येथे शेवटची सभा पार पडली.येत्या २९ ऑगस्ट रोजी ते लाखो मराठा बांधवांसह आझाद मैदानावर आंदोलन छेडणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. राज्यात सध्या गणेशोत्सवाच्या तयारीचा माहोल असतानाच या आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीदेखील जरांगे पाटील आपल्या निर्धारावर ठाम असून, आम्ही मुंबईत येणारच. मराठा समाजाला आरक्षणाचा योग्य हक्क मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजू लागला आहे. आगामी काही दिवसांत राज्याचे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
“ फडणवीस यांचं मराठ्यांना बरबाद करण्याचं स्वप्न पाहत आहेत.”
तसेच, राजकारण्यांच्या दबावात कोणीही राहू नये. मुंबईत कोणताही राजकारणी येणार नाही. सरकारमधून आम्हाला प्रतिसाद दिला जात नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचं मराठ्यांना बरबाद करण्याचं स्वप्न आहे. मराठ्यांची पोरं आत्महत्या करून मेली पाहिजेत, हे त्यांचं काम आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
“ २९ ऑगस्टला आरक्षणाचा तुकडा पाडणार तसेच आम्ही तुम्हाला गुडघ्यावर बसवणार आहोत. येत्या २९ ऑगस्ट रोजी आम्ही आरक्षणाचा तुकडा पाडणार आहोत. मी चार महिन्यांपूर्वीच या आंदोलनाची तारीख जाहीर केली होती. दोन दिवसांपूर्वी आम्ही फोन कॉल केला होता. २९ ऑगस्टच्या आत आमच्या मागण्या पूर्ण करा, असे आम्ही सांगितले होते, असेही यावेळी जरांगे यांनी सांगितले.