पुराच्या पाण्यात रिक्षासह दोघे वाहून गेले.
बीड अग्निशामक दलाकडून एकाचे प्रेत सापडले,दुसऱ्याचा शोध सुरू.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्याला दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी नाले तलाव तुडुंब भरून वाहत आहेत.
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात पावसाने थैमान घातले असुन, वाण नदीला पूर आल्याने रिक्षा चालक पुलावरून जात असताना पुराच्या पाण्यात रिक्षासह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.पुराच्या पाण्यात वाहुन गेलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, धारूरचे तहसीलदार श्रीकांत निळे यांच्या मार्गदर्शनाखाली ना.तहसीलदार सुरेश पाळवदे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक काल रात्रीपासून अथक परिश्रम घेऊन, शोध मोहीम राबवत असुन, यात वाहुन गेलेल्या नितीन कांबळे यांचा शोध लावण्यात त्यांना यश आले तर दुसरे अनिल बाबुराव लोखंडे वय 32 वर्ष यांचा शोध घेण्यासाठी बीडहुन विशेष शोध पथक आले असुन, त्या पथकासह स्थानिक लोखंडे यांचा पावसातही शोध घेत आहेत.
शोध मोहिमेत ना.तहसीलदार पाळवदे यांच्यासह धारूर पोलीस ठाण्याचे वाघमोडे,कपिल गोडसे,भोरजे सह बीड अग्निशामक दलाची टीम शोध करत आहे. याबाबत तालुक्यातील नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊनच घरा बाहेर पडावे.तसेच कुठल्याही नदीनाल्यास पुर आला असेल तर पाण्यात जाण्याचे धाडस करू नये.आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी.असे आवाहन ना.तहसीलदार सुरेश पाळवदे यांनी केले आहे.