ब्रेकिंग न्यूज
C.S.डॉ.अशोक थोरात यांचे निलंबन रद्द !
आमदार नमिता मुंदडाच्या तक्रारीवरून झाले होते डॉ.अशोक थोरात यांचे निलंबन.

बीड – बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांचे निलंबन आरोग्य विभागाने रद्द केले असून त्यांना कामगार विमा विभागात संचालक म्हणून नियुक्ती दिली आहे. डॉ थोरात हे उद्या पदभार स्वीकारणार आहेत.
कोरोना काळात झालेल्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवत केजच्या आ नमिता मुंदडा यांच्या तक्रारीवरून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अधिवेशन काळात डॉ अशोक थोरात यांचे निलंबन केले होते. या विरोधात डॉ थोरात यांनी मॅट आणि उच्च न्यायालय येथे दाद मागितली होती.
दरम्यान राज्य सरकारने चार महिन्यानंतर डॉ थोरात यांचे निलंबन रद्द करत त्यांच्यावर संचालक डॉक्टर अशोक थोरात व पदाची जबाबदारी टाकली आहे. राज्य कामगार विमा विभागाची राज्यातील दहा ठिकाणी हॉस्पिटल असून त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आता डॉ थोरात यांना देण्यात आली आहे.