बीडमध्ये मुसळधार पावसाने गटाराचे पानी घरात-दुकानात शिरले;नागरिकांची तारांबळ.
रस्त्याला आले तळ्याचे स्वरूप,लोकप्रतिनिधी व नगरपालिकाचे प्रशासनाचे दुर्लक्ष.

बीड : बीड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड शहरातील अनेक घरांमध्ये व दुकानांत पाणी शिरले. अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली तर व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दांडी नगर भागातील तळघरात दुकानात पाणी शिरल्याने सामान भिजून खराब झाल्याने व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
धांडे नगर रस्त्याला व परिसराला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते. दुकानात व घरात शिरलेल्या पाणी बाहेर काढण्यासाठी मोटर पंप चा वापर करून पाणी बाहेर काढले. शाळा-कॉलेजला व क्लासेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. काही ठिकाणी पाणी कंबरभर साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दुचाकीस्वार व पादचारी यांना चिखल व पाण्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
नागरिकांची नाराजी
दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवते, मात्र नगरपालिकेकडून कोणतेही ठोस नियोजन केले जात नाही, अशी नागरिकांची नाराजी व्यक्त होत आहे. “नाले व गटारे वेळेवर साफ न केल्यामुळे पाणी घरात घुसते, दुकाने उद्ध्वस्त होतात आणि नाहक आम्हालाच फटका बसतो,” अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली.
प्रशासनाचे आव्हान
अचानक झालेल्या पावसामुळे शहरात पाणी तुंबले असले तरी तातडीने पाणी उपसा व गटारे मोकळे करण्याचे काम सुरू केल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली आहे. मात्र, नागरिकांचा प्रश्न असा आहे की दरवर्षी पावसातच काम सुरू करायचे का, की आधीपासून तयारी करणार?या भागातील लोकप्रतिनिधी व नगरपालिका यांच्या दुर्लक्षने या भागात रस्ते तळ्याचे स्वरूप आले व दुकानात पाणी शिरले असल्याचे दिसत आहे. सकाळपासून एकही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाचा कर्मचारी या भागाचे पाहणी करण्यासाठी आले नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत होते. लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरतेच घरोघरी येऊन भेट घेणार का लोकांच्या समस्या जाणणार का असा सवाल देखील नागरिकांनी केला आहे.