पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आमदार संदीप क्षीरसागर ऑन द स्पॉट !
आमदार संदीप क्षीरसागरामुळे वाचले चिमुकल्यासह आईचे प्राण.

बीड जिल्ह्यात मागील दहा दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच मंडळामध्ये जोरदार पाऊस होऊन पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे.
बीड जिल्ह्यातील शिरापूर घाट भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. अचानक आलेल्या पाण्यात काही नागरिक अडकले होते. याची माहिती मिळताच आमदार संदीप क्षीरसागर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आपत्ती निवारण विभागाच्या मदतीने अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.
या आपत्तीत जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासन व कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न करत असून नागरिकांना सुरक्षिततेचा धीर देण्यात येत आहे. “संकटाच्या काळात धीर सोडू नका, मी तुमच्या सोबत आहे,” असे आश्वासन आमदार क्षीरसागर यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क :
पूरस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आमदार क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी तातडीने संपर्क साधला. त्यांनी परिस्थितीची माहिती देत आपत्ती व्यवस्थापनाकडून मदत देण्याची विनंती केली. अजित पवार यांनीही बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना आवश्यक ती सर्व यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
आई आणि लहान बाळासह सर्व नागरिक सुरक्षित :
पूरामुळे शिरापूर घाटात अडकलेल्या नागरिकांमध्ये एका महिलेचा लहान बाळासह समावेश होता. आमदार क्षीरसागर यांच्या प्रयत्नांमुळे आपत्ती निवारण विभागाच्या मदतीने त्या महिलेचा व तिच्या बाळाचा समवेत सर्व नागरिकांचा सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.
आमदार संदीप क्षीरसागर,राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के, बीड अग्निशामक दलाचे अधिकारी जाधव सह टीमने पुरत अडकलेल्यांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले.