रंगेल शिक्षणाधिकारी बेडसकर व महिलेची ऑडिओ क्लिप व्हायरल !
लक्ष्मण बेडसकरला मुली पुरवणारी ती महिला कोण? बेडसकराचे कारनामे उघड होणार.

बीड (प्रतिनिधी) केजचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्याविरुद्ध विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे केल्या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. घटना घडून चार दिवस झाले आहेत, तरीही केज पोलिसांना बेडसकर सापडत कसा नाही ? त्याच्या मागे कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. लक्ष्मण बेडसकरवर यापुर्वीही महिलांशी संबंधीत आरोप झालेले आहेत. महिला, मुलींना फोन करुन चावट बोलणे, त्यांच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करणे या विषयी अनेकदा तक्रारी सुद्धा झालेल्या आहेत. मात्र बेडसकरला नेहमीच पाठिशी घातले गेले.
लक्ष्मण बेडसकर व एका महिलेची ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून ला महिला पुरवणारी ती बाई कोण? अल्पवयीन मुली पुरवत असेल तर तिच्यावर पोस्को लागणार का?हे पाहावे लागणार आहे. गटशिक्षणाधिकारीच असे नीच कृत्य करत असेल तर शिक्षण विभागासाठी ही लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल.