बीड जिल्हा
मराठी पत्रकार परिषद,डिजिटल मीडिया अंबाजोगाई यांची नवीन कार्यकारिणी
पत्रकार भवन - अंबाजोगाई

अभय जोशी :–
*मराठी पत्रकार परिषद अंबाजोगाई शाखेची नूतन कार्यकारणी जाहीर*
*अध्यक्षपदी बालाजी खैरमोडे कार्याध्यक्ष पूनमचंद परदेशी उपाध्यक्ष सालेम पठाण तर सचिव पदी मारुती जोगदंड*
*अंबाजोगाई (प्रतिनिधी)*
मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशावरून तसेच बीड जिल्हाध्यक्ष विशाल सांळुके यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जिल्हा कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर यांच्या उपस्थितीत अंबाजोगाई मराठी पञकार परिषदेच्या तालुकाध्यक्ष पदी बालाजी खैरमोडे यांची एकमताने निवड करण्यात आली.तर कार्याध्यक्ष पुनम परदेशी, उपाध्यक्ष सालेम पठाण, सचिव मारोती जोगदंड,तालुका संघटक ताहेर पटेल,कोषाध्यक्ष वैभव चौसाळकर,सह कोषाध्यक्ष फिरोज शेख,कार्यकारी सदस्य अभय जोशी, गोविंद जाधव यांची निवड करण्यात आली.
- आज दुपारी 4 वाजता न.प.पञकार परिषद कक्षात संपन्न झालेल्या बैठकीत वरील नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड करण्यात आली.नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन मराठी पञकार परिषदेचे मार्गदर्शक विरेंद्र गुप्ता, एम.एम.कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.यावेळी डिजीटल मिडीयाचे तालुकाध्यक्ष अभिजीत लोमटे,उपाध्यक्ष संजय जोगदंड कार्याध्यक्ष सतिश मोरे,अशोक कोळी,सुर्यकांत उदारे,स.का.पाटेकर,अहमद पठाण,अभय जोशी, गोविंद सुर्यवंशी,बालासाहेब ढगे,दत्ता खोगरे,अहमद शेख,अनिरुद्ध पांचाळ,विश्वनाथ कांबळे,योगेश डाके,उतरेश्वर शिंदे आदी पञकार उपस्थित होते.