शिक्षकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून केला प्राणघातक हल्ला.
हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी.ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याची चर्चा.

बीड येथील के एस के महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला कदम नामक व्यक्तीने फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवले. कालच माजलगाव तालुक्यात ढाबा चालकावर हल्ला केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा बीडच्या केज तालुक्यातील शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडल्याने बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे.
“तुमची मुलगी मला” द्या म्हणत बाजीराव डोईफोडे या शिक्षकाला एका गावगुंडाने गाडीवर ट्रॅक्टर घालत जखमी करून जबर मारहाण केल्याची घटना घडली.विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आल्याची चर्चा आहे.
शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घातल्याने शिक्षक गंभीर जखमी झाल्याने त्याना केज येथील रुग्णालयात प्रथम उपचार करून बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.यामध्ये कारचे मोठे नुकसान देखील झाले आहे.
त्या आरोपी विरोधात याआधी देखील पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती मिळत असून त्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप शिक्षकांच्या सासर्यानी केला असून या प्रकरणात अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेले नाही. डोईफोडे कुटुंबीय बीड पोलीस अधीक्षकाची भेट घेणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.