
माजलगाव : बीड जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यात दहशत गुंडगिरी दादागिरी वाढल्याचे दिसत असून नूतन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी,गुंडाकडून दहशतवाद संपवण्यासाठी जिल्ह्यातील गुंडगिरी,दादागिरी करणाऱ्या टोळकक्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.परंतु बीड जिल्ह्यातील गुंडगिरी काही केल्याने कमी होत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
माजलगाव मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये हा तिसरा खून असून यामुळे माजलगाव मधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने मुलाची हत्या केली. जन्मदात्यांने मुलाच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा घालून निर्घृण हत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. रोहित गोपाळ कांबळे असे मृत तरूणाचे नाव असून गोपाळ विठ्ठल कांबळे असे आरोपी बापाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोहित कांबळे आणि त्याचे वडील गोपाळ कांबळे या दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारू आणण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये नेहमीच वाद होत होता. आज सकाळी दोघेही दारूच्या नशेत असतानाच पुन्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी गोपाळने जवळच पडलेला खोऱ्याचा दांडा रोहितच्या डोक्यात घालून त्याचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहूल सुर्यतळ,पोलिस उपनिरीक्षक आकाश माकणे आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रोहितचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला घटना स्थळावरूनच अटक करण्यात आली असून पुढील तपास माजलगाव पोलीस करत आहे. माजलगाव मधील एक महिन्यांमधील हा तिसरा खून झाला असल्याने पोलिसांची दहशत कमी झाली आहे का?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडला आहे.