
बीड : मांजरसुंबा येथून केज आणि लोखंडी सावरगाव पर्यंत एका भरधाव कंटनेरने आज दुपारी अनेकांना धडका देत गेला असून यामध्ये चिंचोलीमाळी येथील एक महिला ठार जवळपास २५ नागरिक जखमी झाले असून दुचाकी,चार चाकी अनेक वाहनाचे नुकसान झाले आहे. यामुळे या रस्त्यावर या भरधाव कंटेनरच्या थरारामुळे अंगावर काटा आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. हा कंटेनर लोखंडी सावरगाव येथे पलटी झाल्याने पुढे घडणार अनर्थ टळला आहे.
आज शुक्रवारी दुपारी मांजरसुंबा येथून केज कडे येत होता. या कंटेनरने केज शहरात शिक्षक कॉलनी ते धारुर चौक दरम्यान अनेकांना धडक दिली. तो नथांबता तसाच निघून गेला पुढे चंदन सावरगाव जवळही या कंटेनरने धडक दिली. पुढे कंटेनर आणि मागे माणसं रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. हे दृश्य पाहून अनेकांचा थरकाप उडाला असून, या अपघातात चारजण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात असून २५ जण जखमी झाले आहेत. तर हा कंटेनर चालक मांजरसुंबा येथेही धडकून आल्याचे सांगितले जात आहे. तर लोखंडी सावरगाव येथे कंटेनर पलटी झाल्याने पुढे घडणारा अनर्थ टळला आहे. केजमध्ये आज आठवडी बाजार असल्याने या रस्त्यावर जास्त गर्दी असल्याने कंटेनर खाली आली. अनेक नागरिकांना व वाहनांना धडक दिल्याने संतप्त नागरिकांनी तो कंटेनर पेटवून दिला.वेळीच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पेटलेल्या कंटेनर ची आग विजवल्याने पुढील अनर्थ टळला.त्यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूक कोंडी झाली होती.