जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी PSI रणजीत कासलेवर केला गुन्हा दाखल.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची बदनामि केल्याने गुन्हा दाखल.

बीड (प्रतिनिधी):-बीड सायबर मधील पीएसआय रणजीत कासले याने बाहेर राज्यात जाऊन पैशाची मागणी केल्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कासलेचे तडकाफडकी निलंबन केलं होतें. तसेच कासलेत गुन्हा दाखल झालेले तो फरार होता, परंतु फरार असताना त्याने सोशल मीडियावर व वृत्त वाहिनीला मुलखत देत परळी येथे कार्यरत असताना धनंजय मुंडे व वाल्मीक कराड वर आरोप केले होते. तसेच पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने कासले चांगलेच चर्चेत आले होते. तसेच ॲट्रॉसिटी देखील कासलेवर दाखल झाली होती.बीड पोलिसांनी त्याला पुण्यातून ताब्यात घेतले होते. त्यामुळे कासले काय दिवस कारागृहात होते. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्यावर पुन्हा कासलेने बीड कारागृहामध्ये वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट व जेवण देत असल्याचे व्हिडिओ व्हायरल केले होते.
बडतर्फ पीएसआय रणजीत कासले याने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरून सामाजिक न्यायमंत्री तथा शिवसेना पक्षाचे बीड जिल्हा संपर्कमंत्री संजय शिरसाट यांच्याविषयी खोटी व दिशाभुल करणारी माहिती सोशल मिडीयावर प्रसारीत करून ना. शिरसाट व शिवसेना पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात कासले विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी तक्रार दिली आहे. स्वप्नील गलधर यांनी दिलेल्याफिर्यादीत म्हटले आहे की, दि.३० मे रोजी दुपारी सोशल मिडीयावर पीएसआय रणजीत रेड्डी या नावाने असलेल्या आयडीवरून ना. संजय शिरसाट यांच्या नावाचा उल्लेख करून कासले याने संभाषणाची क्लिप प्रसारीत करून संजय शिरसाट व शिवसेना पक्षाची बदनामी केली आहे. त्यानुसार बीड शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी बीड सायबर पोलीस ठाण्यात रणजीत कासले विरूध्द बीएनएस कलम ३५६, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ८४-सी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.