ब्रेकिंग न्यूज

दणदणाट करणाऱ्या DJ वर दंडात्मक कारवाई.

बीड शहर पोलिसांची कामगिरी.

बीड शहरातील लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमात मोठमोठ्या आवाजात DJ लावले जातात,त्यामुळे स्थानिक नागरिकांना व रस्त्यावर ये जा करणाऱ्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच डीजे मुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र बीड शहरात पहावयास मिळते.त्यामुळे मंगल कार्यालय मालकांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकत्व होत आहे.

     बीड शहर पोलिसांना माहिती मिळाली होती की, एक DJ सावता माळी चौक जवळ लग्नात DJ द्वारे मोठमोठाने गाणे वाजवत आहे. त्यामुळे तेथील भागात राहणाऱ्या नागरीकांना प्रचंड त्रास होत होता. तसेच रहदारीस अडथळा होत असल्याने लोक त्रस्त झाले होते. या DJ ला जागेवरून ताब्यात घेण्यात आले. त्याबाबत RTO ला लेखी माहिती देण्यात आली. RTO यांनी परीक्षण करून DJ वाहन क्रमांक MH20 AT 2229, मालक शेख सय्यद शेख वाजेद, राहणार खरसुंडी तालुका जिल्हा बीड, यांना 69000/- रुपये दंड आकारण्यात आला आहे.

    सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, यांचे सूचना प्रमाणे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, सपोनी बाबा राठोड, पोलीस नाईक जायभाय, पोलीस हवालदार गर्जे, पोलीस हवालदार शौकत, पोलीस शिपाई मनोज परजणे यांनी कारवाई केली आहे.

बीड शहरातील बार्शी रोडवरील मंगल कार्यालय, सामाजिक प्रतिष्ठान मध्ये देखील मोठ्या मोठ्या आवाजात डीजे लावल्याने या परिसरातील बालकांना वयोवृद्ध नागरिकांना याचा त्रास होत असून,या परिसरात एक इंग्लिश स्कूल असून,शिकवणी क्लासेस देखील आहेत त्यामुळे लग्न समारंभ कार्यक्रमातील DJ च्या आवाजावर मर्यादा ठेवून, परिसरातील नागरिकांना याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, सदरील मंगल कार्यालय लाखाच्या पुढे पैसे घेऊन मोकळे होतात मात्र परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्या DJ वाहनाची RTO कार्याला कडून परवाना घेतली आहे का?हे देखील RTO अधिकाऱ्याने तपासणी पाहिजे.

आवाजाची मर्यादा ओरडणाऱ्या DJ सह मंगल कार्यालय मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button