अपार्टमेंट मध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा.
API वर्षा व्हगाडे यांची कारवाई,बीड शहरातील,जिल्ह्यातील लॉज तपासावे.

बीड शहरातील उच्चभ्रू वस्ती इंडिया बँक कॉलनी येथे AHTU पथकाचा छापा, एक आंटी व एक दलाल अटकेत, परराज्यातील एका महिलेची सुटका.
बीड .दिनांक 30 मे 2025 रोजी बीड शहरातील जालना रोडवरील इंडिया बँक कॉलनी येथे एका आपार्टमेंट मध्ये एक महिला व एक पुरुष परराज्यातील महिला आणून तिचे कडुन वेश्या व्यवसाय करून घेतात, अशी गोपनीय माहिती AHTU पथक प्रमुख API वर्षा व्हगाडे यांना मिळाली होती. त्यावरून सदर भागामधील राम अंश अपार्टमेंट मध्ये फ्लॅट-02 मध्ये AHTU पथक बीड यांनी डमी ग्राहक व दोन पंचांसह सापळा रचून रेड केली असता, सदर ठिकाणी पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद, कोलकत्ता येथील एक पिडीत महिला हीचेकडून ऑंटी नामे 1)शकुंतला सुरेश राऊत वय 40 वर्ष राहणार फ्लॅट क्रमांक 02 राम अंश अपार्टमेंट इंडिया बँक कॉलनी बीड,ही
2) दलाल महेश मोहनराव चांदणे, वय 33, राहणार गया नगर बीड, याचे व 3) मुमताज नासिर शेख गेवराई हीचे मदतीने स्वतःचे भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. सदर कामास मुमताज नसीर शेख , कामासाठी महिला पुरवत असे, व दलाल महेश चांदणे हा त्याचे रिक्षा क्रमांक MH- 23 AR 0509 यातून मुलींची ने आण करून शकुंतला राऊत हिच्याकडे महिला पुरवत असे.
याप्रकरणी या तिघांवरही अनैतिक मानवी प्रतिबंध कायदा कलम 03,04,05,06 या अन्वये व भारतीय न्याय संहिता कलम 143 (2) अन्वये पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून ऑंटी शकुंतला राऊत, व आरोपी महेश चांदणे यास अटक करण्यात आलेली आहे, सदर प्रकरणातील आरोपी क्रमांक 01 व 02 हे दोन्ही आरोपी सराईत असून यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे 2021 व 2022 मध्ये पिटा कायद्यांतर्गत तसेच IPC 324,427,138 अन्वये गुन्हे दाखल आहेत.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास गात, AHTU पथक प्रमुख API वर्षा व्हगाडे, पुरुष अंमलदार ASI 783 संजय सुरवसे, पोह/242 अशोक शिंदे, पोह 2157 प्रदीप येवले, महिला हवालदार 1273 अनिता माने, पोह 1347 मनीषा खरमाटे यांनी केली.
बीड शहरातील व जिल्ह्यातील काही लॉज मध्ये देखील सर्रास वेश्या व्यवसाय व अल्पवयीन जोडप्यांना रूम दिल्या जात असल्याची माहिती मिळत असून अशा लॉजवर देखील कारवाई करण्यात यावी.