ब्रेकिंग न्यूज

बीडमध्ये गो तस्कराकडून DYSP च्या गाडीला उडवण्याचा प्रयत्न.

DYSP सह कर्मचारी बचावले,पिकपसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

बीड दि. ३१ (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात गो तस्करी मध्ये वाढ झाली असल्याचे पहावयास मिळत असून स्थानिक पोलिसांनी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्यानेच गो तस्करी बिनधास्त होत आहे.

DYSP पूजा पवार यांना गुप्त माहिती मिळाली की बार्शी रोडवरील शासकीय दूध डेरी समोर एका पिकअप गाडीतून गो तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्याने बोलेरो पिकअप (क्र. एम एच. २३ डब्ल्यू ३७५४) या गाडीला थांबण्याचा इशारा केला मात्र गाडी चालकाने स्वतःच्या गाडीने पोलिसांच्या वाहनाला जोरदार डॅश मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी पहाटे बार्शी नाका परिसरात घडला. यामध्ये पोलीस वाहनाचे मोठे नुकसान झाले असून डीवायएसपी पूजा पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी बालंबाल बचावले.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बार्शी नाका भागात आलेल्या पीकपमध्ये गाई असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्या पीकअपला गाडी थांबवण्यास सांगितले मात्र त्याने गाडी न थांबवता पोलिसांच्या गाडीलाच डॅश मारला व गाडीतील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला. यात अधिकारी बालंबाल बचावले मात्र त्यानंतर तात्काळ डीवाएसपी पूजा पवार यांनी आरोपीवर झडप घालत दोन आरोपींच्या मुस्क्या बांधल्या, या गाडीत जर्सी जातीच्या गाय कोंबून घेऊन जात असल्याचे दिसून आले. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात फिर्यादी पोलीस अंमलदार दीपक गजानन लहाने यांच्या तक्रारीवरून आरोपी जाबेर कडू पठाण, जीशान अब्दुल सत्तार कुरेशी, उमेर कुरेशी (तिघे राहणार बीड) यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व गो तस्करी प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जाबेर पठाण, जीशान कुरेशी या दोघांना अटक करण्यात आली असून उमेर कुरेशी हा फरार आहे.पिकअप गाडीसह एकूण ८ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी घटनास्थळी धाव घेतली. डीवायएसपी पूजा पवार यांच्या वाहनाला धडक देत जीव मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पेठ बीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी हे करत आहेत. बार्शी नाका भागात दररोज गो तस्करी होत असून स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष केल्याने गो तस्कर बिनधास्त वाहनांमध्ये जनावरे घेऊन येत आहेत तरी पेठ बीड पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहून गो तस्करी रोखावी अशी मागणी गोरक्षका कडून होत आहे.

ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp पूजा पवार मॅडम, पो. हे.जीवा गंगावणे, पो.अनिल मदने,चालक दीपक लहाने यांनी केली.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button