ब्रेकिंग न्यूज
बीड शहरात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह.
छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ.

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर फारुकी पेट्रोल पम्प समोर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला.
बीड शहरातील गजबजलेल्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये आज दिनांक ७ जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान मृतदेह असल्याची माहिती बीड शहर पोलिसांना मिळाली असता तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रेत पुढील तपासणीसाठी बीड येथल शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. शहरातील मुख्य चौकातच मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली, मृतदेहाची ओळख पटली नसून पुढील तपास बीड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत.काही वेळातच सविस्तर वृत्त देण्यात येईल.