ब्रेकिंग न्यूज

राक्षस भुवन येथील अवैध वाळू उपसावर छापा

१७ लाखाचा मुद्देमाल जप्त,बीड स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यावरुन पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड स्था.गु.शा.बीड यांनी अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी अवैध धंद्ये करणारांची गोपनिय माहिती काढुन कारवाई करण्यासाठी स्थागुशा पथकांना सुचना दिलेल्या आहेत. 

त्यावरुन दिनांक 15/06/2025 रोजी स्थागुशा बीड येथील पोउपनि महेश विघ्ने हे वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस ठाणे चकलांबा हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना गुप्त बातमी मिळाली की, ईसमनामे अक्षय पोटफडे व करण पोटफेडे हे ट्रॅक्टर, लोडर व ट्रॉली च्या सहाय्याने राक्षस भुवन नदी पात्र मधून अवैध रित्या वाळू उपसा करत आहेत.यावरुन सदर ठिकाणी दोन पंचाना पाचारण करुन पोलीस स्टाफसह पोलीस उपनिरीक्षक विघ्ने यांचे टीम ने राक्षस भुवन नदी पात्र येथे अचानक छापा टाकला असता ईसमनामे अक्षय पोटफडे व करण पोटफेडे हे लोडर चे सहाय्याने अवैध रित्या कोणताही परवाना नसताना वाळू उपसा करत असताना मिळून आले.त्याचे ताब्यातून 2 ट्रॅक्टर ,लोडर,ट्रॉली व दीड ब्रास वाळू असा 17,06000 रू चा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला.दोन्ही आरोपीस पोलीस स्टेशन चकलांबा येथे हजर करुन त्याचे विरुध्द पोउपनि महेश विघ्ने स्थागुशा,बीड यांनी सरकार तर्फे फिर्याद देवुन गु.र.नं 213/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) भा.न्या.सअन्वये गुन्हा नोंद केला आहे. 

सदरची कामगिरी नवनित कॉंवत पोलीस अधीक्षक,बीड सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, पोनि.शिवाजी बंटेवाड स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने , स.फो, जयभाये,पोह/ राजु पठाण, महेश जोगदंड,राहुल शिंदे, पो अं /बप्पासाहेब घोडके, चालक सुनील राठोड यांनी मिळुन केलेली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button