ब्रेकिंग न्यूज

बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णाला फरशीवर झोपून उपचार !

CS राऊत यांनी रुग्णाची दयनिय अवस्था पहावी,गैरहजर डॉक्टर व कर्मचाऱ्यावर कारवाई कधी?

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्हा रुग्णालयाची अवस्था एखाद्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राला लाजवेल अशी झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्राला तरी बऱ्यापैकी सुविधा असतात,रुग्णावर उपचार व्यवस्थित केले जातात त्यापेक्षाही वाईट परिस्थिती बीडच्या जिल्हा रुग्णालयात दिसून येत आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना चक्क फरशीवर झोपवून उपचार केले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने जिल्हा रुग्णालयातील कारभारा बाबद प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.त्या वार्ड मध्ये जवळपास 50 रुग्णावर उपचार करण्यासाठी एकच सिस्टर उपस्थित होत्या.

कोविडच्या काळात गाद्यांचा खच,ऑक्सिजनने भरलेली सिलेंडर आणि कॉटची रांग लागलेली होती. मग एवढं सगळं सामान गेलं कुठं ? अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना बीडच्या रुग्णालयातील ही स्थिती खरोखरच विदारक आहे. जे अजितदादा अख्ख्या राज्याला निधी देतात त्याच अजितदादांच्या जिल्ह्यात ही परिस्थिती असेल तर इतर ठिकाणची कल्पनाच न केलेली बरी. प्रत्येक दौ-याच्या वेळी नुसत्या बैठका घ्यायच्या, मोठमोठ्या घोषणा करायच्या, आढावा बैठका घेऊन फक्त आश्वासन द्यायची याला आता जिल्हावासीय कंटाळले असून,बीडची बारामती कधी होणार?असा देखील प्रश्न बीड जिल्हावासिया करत आहेत. त्यासाठी प्रत्यक्ष ग्राऊंड लेव्हलवर काय सुरु आहे, लोकांना कशा प्रकारचे हाल सहन करावे लागतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे.

बीड जिल्हा शिंदे चिकित्सक राऊत यांच्या ढिसाळ नियोजनामुळे व दुर्लक्षने रुग्णालयातील ब्रदर आणि सिस्टरच्या भरोशावर काही डॉक्टर्स फक्त रेस्ट करताना दिसून येत आहेत.

बीड जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. राऊत यांनी पदभार घेतल्यानंतर तेथील कारभार सुधारण्याचा प्रयत्न केला, मात्र अजूनतरी त्यांना फारसा प्रभाव पाडता आलेला नाही.ते आपले सरळ साधे आहेत.मात्र त्याचा गैरफायदा जिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टर्स घेत आहेत. नाईटला असणारे काही डॉक्टर एका कक्षात बसून रेस्ट करतात,विशेष म्हणजे वार्डाची जबाबदारी हे महाशय ब्रदर आणि सिस्टरवर टाकून मोकळे होतात. दोघांच्या भरोशावर वार्ड सोडून देणारे काही डॉक्टर रात्रभर केवळ आलो म्हणून हजेरी लावतात आणि सकाळी झोपेतून उठून निघून जातात. खरंतर अशा डॉक्टरां विरुद्ध कारवाईची गरज आहे.यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल वरपे यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कामात हलगर्जी करणाऱ्या व गैरहजर असणारे डॉक्टर यांच्यावर निरमाची कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन दिले.

बीड जिल्हा रुग्णालयाला प्रत्येक वेळी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते,अत्याधुनिक मशनरी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना इतर जिल्ह्यात रेफरसह खाजगी रुग्णालयात हलवावे लागते. कधी कधी लाईट नसल्यामुळे रुग्णांचे हाल होतात. तीन-चार दिवसापुर्वीच एका जळीत वॉर्डामध्ये गंभीर भाजलेल्या अवस्थेत आलेल्या महिलेवर उपचार करण्यासाठी एकही डॉक्टर उपलब्ध होऊ शकला नाही. सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल वरपे व नातेवाईकांनी सुद्धा डॉक्टरांना फोन केले. एवढचं काय सिव्हील सर्जन यांनाही फोन लावले. परंतु एकही डॉक्टर वेळेवर येऊ शकला नाही. शेवटी त्या महिलेला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले.तसेच रुग्णालयात स्वच्छता, साफसफाई केली जात नसल्याने रुग्ण सेवेशी संबंधीत अनेक समस्या निर्माण होत आहेत.यासाठी पालकमंत्री अजित दादा पवार यांनी जिल्ह्यातील रुग्णसेवेवर लक्ष देण्याची गरज आहे.चक्क फरशीवर झोपून रुग्णाला उपचार केले जात असतील तर संतापजनक घटना असून याकडे बीड जिल्हा शिंदे चिकित्सक राऊत यांनी लक्ष घालून गैरहजर राहणाऱ्या व कामात हलगर्जी करणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे तरच बीड जिल्हा रुग्णालयातील कारभार सुधारेल.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button