बीड मध्ये राष्ट्रवादिची गटबाजी चव्हाट्यावर !
डॉ.योगेश क्षीरसागराचा फोटो काही बॅनर वरून गायब.

बीड मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये फूट?
बॅनरवरून स्थानिक नेते गायब; दोन वेगवेगळ्या गटांच्या चर्चा शहरात रंगल्या.
बीड(प्रतिनिधी)बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये अंतर्गत गटबाजीचे वारे वाहत असल्याचे संकेत दिसून येत आहेत. अलीकडेच राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक व महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचा बीड जिल्हा दौरा पार पडला. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली.
बीड शहरात आज नाट्यगृहामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत पार पडला. हा मेळावा पदाधिकारी व कार्यकर्त्यासाठी होता तसेच येणाऱ्या नगरपालिका,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मध्ये एकजुटीने काम करण्यासाठी होता.परंतु विशेष म्हणजे, या बॅनरवर डॉ. योगेश क्षीरसागरचा फोटो दिसून आले नाहीत. काही बॅनरमध्ये एक गट तर इतर बॅनरमध्ये दुसरा गट दिसून आल्याने पक्षात अंतर्गत मतभेद व गट-तट निर्माण झाल्याच्या चर्चा शहरात सुरू आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही यावरून संभ्रमाचे वातावरण आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)पक्षाची गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.
या घडामोडींमुळे बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये फूट पडली का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली अमर नाईकवाडे, फारुख पटेल यांचा एक स्वतंत्र गट आहे,तर आता बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण व बळीराम गवते यांचे बॅनर संवाद मिळाव्या दरम्यान शहरात लावण्यात आले होते, परंतु त्याच बॅनरवर स्थानिक युवा नेत्याचा फोटो नसल्याने चर्चेला उधाण आले.आता पक्षातील वरिष्ठ नेते यावर काय भूमिका घेतात आणि स्थानिक स्तरावरील गटबाजी कशी हाताळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.