महादेव मुंडेंच्या हत्येचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर,महादेव मुंडेंचा गळा कापला.
महादेव मुंडेंच्या तोंड,मान,हातावर एकूण 16 वार.

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची परळी शहरात दिड वर्षापूर्वी हत्या झाली होती.त्या हत्येचा बनाव अपघात झाला असे प्रथम दर्शविण्यात आले होते,परंतु महादेव मुंडे च्या कुटुंबीयांनी आक्षेप घेत हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करण्यात आला होता.
महादेव मुंडे च्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. तोंड, मान, हातावर एकूण 16 वार करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.
पोस्टमार्टम रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली असून अतिरक्तस्राव झाल्याने धक्क्यात जाऊन महादेव मुंडेंचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महादेव मुंडेच्या गळ्यावर 20 सेंमीपर्यत लांब, 8 सेंमी रुंद आणि 3 सेंमी खोल असा हा वार होत.
मानेवर उजव्या बाजूने 4 वार, प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा.मात्र एवढ्या भयानक पद्धतीने वार असतानाही पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात अंगावर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचा आहवाल आला आहे.त्यामुळे महादेव मुंडे यांचा अपघात नसून घात हत्या असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मागील आठवड्यात महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन मागणी केली होती की माझ्या पतीच्या मारेकऱ्यांचा शोध लावा, हे प्रकरण दीड वर्षांपूर्वीचे असल्याने आरोपाची व तपासात अडचणी येत असल्याचे पोलिसाकडून कारण सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
महादेव मुंडे च्या पत्नीला खरंच न्याय मिळणार का? महादेव मुंडे च्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन कधी अटक करणारा असा प्रश्न ज्ञानेश्वरी मुंडे सह बीड जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे.परंतु महादेव मुंडे चा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्याने आता तपासाला वेग येईल अशी माहिती मिळत आहे.