वांगी येथील बालासाहेब गोरख हाडूळे यांच्या शेळ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याने या हल्यात ११ शेळ्यांना ठार झाल्या आहेत.यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले असून या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे
बीड तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने त्या हिंस्त्र प्राण्याचा, बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.या शेतकऱ्याला वनविभागाने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
शेळ्याच्या कळपावर बिबट्यानेच हल्ला केला की दुसरे एखाद्या हिस्त्र प्राण्याने याचा तपास देखील वनाधिकाऱ्यांनी लावण्याची गरज असून, बिबट्याने हल्ला केल्याची अफवा आहे याचा खुलासा करावा अशी देखील मागणी शेतकरी करत आहेत.