जुगार अड्ड्यावर धाड,२३ लाखाचा मुद्देमाल जप्त.
नऊ जुगारी पोलिसांच्या ताब्यात,बीड ग्रामीण पोलिसांची कारवाई.

बीड (प्रतिनिधी):- बीड- नवगण राजुरी रस्त्यावर चऱ्हाटा फाट्या नजीक तळेगाव शिवारात पत्त्याच्या क्लबवर बीड ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयांचा माल जप्त केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
याबाबत पोलीस सूत्राकडून समजलेले अधिक माहिती अशी की, तळेगाव शहरातील सम्राट बिअर बारच्या पाठीमागील अभिनव क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तळेगाव असा बोर्ड लावलेल्या एका इमारतीत पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाली त्यानुसार बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या टीमने सदर ठिकाणी धाड टाकून पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत असताना दीपक अंबादास गायकवाड (वय ३६ वर्ष रा. पाली), हनुमान लक्ष्मण सुरवशे (वय २३ वर्षे रा. आहेरचिंचोली), लक्ष्मण उत्तम नवले (वय ५४ वर्ष रा. पाली), श्याम आनंदराव वीर (वय ६१ वर्ष रा. बीड), भाऊसाहेब रावसाहेब शेळके (रा. हिवरा पहाडी), सुभाष तुळशीराम शिंदे (वय ५१ वर्ष रा. उमरद जहांगीर), भारत लक्ष्मण जाधव (वय ५५ रा. बीड), राधाकिसन शेषेराव लोंढे (वय ४२ वर्षे रा. तळेगाव) यांना पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून रोख ८२३० रुपये, १,३७००० हजार रुपये किमतीचे मोबाईल, एक लाख रुपये किमतीच्या तीन मोटरसायकली, २१लाख रुपयांच्या दोन कार असा एकूण २३ लाख ४९ हजार ७३० रुपयाचा माल जप्त केला.
अभिनव क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव छत्रभूज भवानी वाघमारे वय ३९ वर्ष रा. हिवरा पहाडी हे सदर इसमांना पत्त्याचा तिरट नावाचा जुगार पैशावर अभिनव क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अनुज्ञाप्तीतील नियमाचे उल्लंघन करून दारू आणि तांबाखूजन्य पदार्थाचा पुरवठा करून सार्वजनिक ठिकाणी घनकचऱ्याचा उपद्रव केला वरील वर्णनाचा मुद्देमाल जागीच पंचासमक्ष जप्त करून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी पो.हे.को. मच्छिंद्र बडे यांच्या फिर्यादी वरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ९ लोकांविरुद्ध कलम ते २२३ भा.न्या.सं. कलम १२ (अ) मुजुका कलम ११५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.का. फिरोज पठाण हे करीत आहेत. सदर कारवाईमुळे अवैद्य धंद्यावाल्याचे धाबे दणाणले आहेत.
ही कारवाई नवनीत कॉवत बीड पोलिस अधिक्षक,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. बाळराजे दराडे, पो.ह. मच्छिंद्र बडे, फेरोज पठाण, अतिश मोराळे, पो.ना. नामदेव सानप पो.शि. कांदे यांनी केली.