ब्रेकिंग न्यूज

बीड मध्ये टोळक्याकडून एकास मारहाण.व्हिडिओ व्हायरल.

कोयते,कुकरी हातात घेऊन दहशत,पोलिसांत पाच दिवसानंतरही गुन्हा दाखल नाही.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यात मारहाण करतानाचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात असून असे व्हिडिओ काढून प्रसारित करणाऱ्यावर बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी कठोर कारवाई करण्याचे आधी दिले असताना देखील तेलगाव नाका परिसरात सत्तुर ,कोयता घेऊन एका तरूणाला त्याची भिती दाखवत नंतर त्याच कोयता आणि सत्तुरने त्याच्यावर हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 चार ते पाच गुंडांनी रस्त्यावर अडवून त्या तरूणाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ देखील बनवला आहे. या हल्ल्यात तरूण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होऊनही पोलीसांनी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही. मारहाणीचे व्हिडीओ सर्रास व्हायरल होत असतांनाही पोलीस अशा प्रकरणांमध्ये गांभीर्याने घेत नसल्याचे या प्रकारावरून दिसुन येते.

बीड शहरातील तेलगाव नाका भागातील शेख असीम अनिस (वय २४) हा तेलगाव नाका परिसरातून जात असतांना चार ते पाच गुंडांनी त्याला अडवले. हातात सत्तुर आणि कोयता घेऊन आधी त्याला भिती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत हातातील धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये शेख असीम याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याला दि.२४ जुलै रोजी बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला खाजगी रूग्णालयात रेफर करून त्याच्यावर त्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून या प्रकरणाला पाच दिवस झाले तरीही पेठ बीड पोलिसात अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.यामुळे पोलिसांना या घटनेचे गांभीर्य नसल्याचे दिसत नाही.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button