मांजरा धरण ८०% भरले,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या तीनचार दिवसापासून संतत कोसळणाऱ्या पावसामुळे धनेगाव येथील मांजरा धारणावेगाने पाणी येत असून लवकरच धरण पूर्ण भरण्याची स्थिती आहे. आज दि १६ ऑगस्ट रोजी सकाळी धरणाची पातळी ६४१.५० घन मीटर झालेली असून धरण ७९.६३% भरले आहे.
मांजरा धरणाची एकूण क्षमता २२४ दशलक्ष घनमीटर असून जिवंत पाण्याचा साठा १४०.९७ दशलक्ष घनमीटर आहे. एकूण पाणीसाठा १८८.०७ दशलक्ष घनमीटर एवढा झाला आहे आत्ताही वरच्या भागातून पाण्याची मोठी आवक सुरूच असल्याने धरणाचे दरवाजे उघण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे मागील काही दिवसात धरण पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाला असून पूढेही 2,3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहेच. पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पूर्ण धरण भरण्याची शक्यता असल्याने अतिरीक्त पाणी मांजरा नदीत सोडावे लागणार आहे .
त्यामुळे नदी काठच्या गावांना पुरसदृश्य परिस्थिती होऊ शकते त्यासाठी मांजरा नदीकाठच्या गावांना,वस्त्यांना,शेतकरी नागरिकांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.