तरुणांवर घरात घुसून प्राणघातक हल्ला ! तरुणाची प्रकृती गंभीर.
पाच ते सहा अज्ञातानी भाऊ,बहिणीवर केला हल्ला,डोक्यावर २७ टाके.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरालगत असलेल्या पालवन गावात विलास भारत मस्के वय ३२ वर्ष राहणार पालवन यांच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.
दिनांक २१ ऑगस्ट गुरुवार रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एकाने घराचा दरवाजा वाजूऊन मस्के यांना बाहेर बोलवत मारहाण करण्यास सुरुवात केली,मस्के यांची बहीण मरू नका ही विनंती करत होत्या परंतु त्यांना देखील मारहाण केल्याने हाताला दुखापत झाली मस्के यांना पाच ते सहा जणांनी प्राणघातक हल्ला करत तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने वार केल्याने मस्के गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.डोक्याला व हाताला गंभीर दुखापत असल्याने त्यांना बीड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले.हल्ला कोणी व का केला याचा याचे कारण मात्र समजू शकले नाही,हल्ल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला.हल्लेखोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याची माहिती मिळत आहे.
हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मस्के यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याने,अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झाला नाही.विलास मस्के हे शिवसेना मराठवाडा निरक्षक बाजीराव चव्हाण यांचे सहकारी असल्याची माहिती मिळत आहे.