शहराला आले तळ्याचे स्वरूप पहा !
बीडचा विकास,गटारगंगा ओसंडून वाहिली,गटारातील कचरा,पाणी रस्त्यावर.

बीड(प्रतिनिधी): पावसाळपूवी नियोजन करण्यात बीड नगर पालिका पुन्हा फेल झाल्याचे चित्र झालेल्या काल झालेल्या दमदार पावसाने पाहायला मिळाले.गेल्या दोन दिवसांपासुन शहरात रिमझिम पाऊस सुरू होता.
परंतु काल गुरूवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर गुडघ्याएवढे पाणी साचले होते.गटारीतील कचरा रोडवर आल्याने अनेक ठिकाणी तळ्याचे स्वरूप आले होते.पुन्हा जालना रोडलगत असलेला मोठा नाला तुडूंब भरल्याने आणि त्यातील गाळ, कचरा रोडवर आल्याने सिमेंट रोडची एक बाजू पूर्णपणे पाण्यात होती. जालना रोडकडून शाहुनगरकडे जाणाऱ्या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. या भागातील अनेक दुकानांमध्ये आणि घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.
शहरातील माळीवेस, रिपोर्टर भवनापासुन दिप हॉस्पीटलमार्गे बार्शी रोडकडे जाणारा रस्ता, लक्ष्मणनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसर, बस स्थानक,भाजी मंडई, नागोबा गल्ली, धानोरा रोड यासह इतर भागातील रस्त्यांना चक्क तळ्याचे स्वरूप आले होते. गटारीतील कचरा रोडवर आल्याने अनेक ठिकाणी तळ्याचे स्वरूप आले होते.
शहरातील स्टेडियम मध्ये तर स्विमिंगपूल झाल्याचे दिसत होते.जालना रोड भागातील अनेक दुकानांमध्ये, गॅरेज मध्ये आणि घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. दरम्यान बीड नगर पालिकेकडून मान्सुन पुर्व कार्मावर लाखो रूपये खर्च केले जात असले तरी प्रत्यक्षात बीडचे पावसामुळे काय हाल होत आहे?बीडचा विकास पुन्हा एकदा ओसंडून वाहताना बीड शहर वासियांना पाहायला मिळाला,अचानक झालेल्या संततधार पावसाने नागरिकांची मात्र तारांबळ उडाली होती.पावसामुळे गटारातील पाण्यातून मार्ग काढावा लागत होता.रस्त्यावर ठिकठिकाणी तळे साचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत होते,तसेच वाहतूककोंडीचा देखील सामना नागरिकांना करावा लागला.दोन तासाच्या पावसाने बीड शहराची काय परस्थिती होती हे एकदा प्रशासनातील वरीष्ट अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून पाहायला हवे.