
बीड दि.३० : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ शनिवारी (दि.३०) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने सहा जणांना चिरडले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमी व मयत हे पेंडगाव येथे दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृताची नावे:
1)विशाल श्रीकिसन काकडे. शेकटे ता. शेवगाव जिल्हा अहमदनगर.
3)आकाश कोळसे रा. बीड.
4) पवन जगताप राहणार बीड
5)अनिकेत शिंदे.शोदोड
6)किशोर तावरे.राहणार.गेवराई
7)दिनेश पवार रा. नाळवंडी नाका बीड.
काही दिवसांपूर्वी गढी उड्डाणपुलाजवळ अशाच प्रकारे कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.यावेळी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी व ग्रामस्थांनी जखमींना बीड जिल्हा रुग्णालय प्रमुख उपचार साठी दाखल करण्यात आले.सविस्तर व्रत व इतर जखमीची नावे थोड्याच वेळात दिली जातील.