गणपती विसर्जनला डीजेवर मोठी कारवाई,१ कोटी २७ लाखाचा मुद्देमाल जप्त.
पोलीस निरीक्षक मूदीराज ॲक्शन मोडवर,पळून गेलेल्या १९ डीजे मालकांवर गुन्हे दाखल.

बीड (प्रतिनिधी)बीड पोलिस अधीक्षक यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास बंदी घालण्यात आली होती.DJ बाबद सक्त ताकीद देत नियमावली तयार करण्यात आली होती. मात्र सदरील नियमांचे उल्लंघन करुन पेठ बीड भागात डीजेचा वापर केला गेला.
त्यानुसार पोलीस प्रशासनाने पेठ बीड भागातून १० डीजे जप्त करून पोलीस आल्याने घटनास्थळावरुन पळून गेलेल्या १९ डीजे मालकांविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीसाठी नियमावली ठरवून दिली होती. या संदर्भात सर्व गणेश मंडळांना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना देखील करण्यात आल्या होत्या. विशेषतः मिरवणुकीमध्ये डीजे वाजविण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र काही गणेश मंडळांनी नियमांचे उल्लंघन करत मिरवणुकीत डीजे वाजविला. तसेच पोलिसांनी त्यांना थांबण्याच्या सूचना केल्या असता ते घटनास्थळावरुन पळून गेल्याचे प्रकार देखील घडले आहेत.त्यामुळे DJ वाहनावर व मालकावर गुन्हे दाखल करण्यात आहे असून पेठ बीड पोलीस प्रशासनाने १ कोटी २७ लाख रुपयांचे १० डीजे जप्त केले आहेत तर १९ डीजे मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सदरील डीजे मालकांविरोधात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय बीड यांना पत्रव्यवहार करुन मोटारवाहन कायदा व वाहनात बेकायदेशीर केलेल्या बदलाबाबत तसेच वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड ठाण्याचे पो.नि.अशोक मुदीराज यांच्यासह पेठ बीड ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी केली.जप्त केलेल्या DJ उपप्रादेशिक वाहन कार्यालय अधिकारी यांच्या ताब्यात देऊन दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती पेठ बीड पोलीस निरीक्षक अशोक मूदीराज यांनी दिली.