
बीड(प्रतिनिधी)बीड शहरा नजीक असलेल्या इमामापूर रोड लगत लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.
जयराम बोराडे असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव असून राहणार भाटसांगवी आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याचे सुमारास इमामपूर रोडवरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ झाली. या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोराळे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रेत बीड शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. बोराडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून थोड्याच वेळा सविस्तर वृत्त देण्यात येईल.