टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष राकेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त 501 कुटुंबांना एक लक्ष रुपयांचा विमा !
पै.तानाजी भाऊ जाधव,अनिकेत घुले,उमेश पोखरकर यांची प्रमुख उपस्थिती.

बीड (प्रतिनिधी) टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य राज्यात देशात सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणारी संघटना म्हणून ओळखली जाते. राज्यातील कोणत्याही कोपऱ्यात कोणालाही कधीही अडचण निर्माण झाल्यास टायगर ग्रुप महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यास फोन करतात त्या व्यक्तीची अडचण दूर करण्याचे सामर्थ्य फक्त टायगर ग्रुप महाराष्ट्र संघटनाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. बीड जिल्ह्यातही टायगर ग्रुप महाराष्ट्र संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.
टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष राकेश जाधव यांचा वाढदिवस येत्या १४ सप्टेंबर असून विविध सामाजिक उपक्रमासह वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
राकेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त 501 कुटुंबांना प्रत्येकी एक लक्ष रुपयांचे अपघाती विम्याचे कवच मिळणार आहे. यासह माता भगिनींचा सत्कार, विविध मान्यवरांचा सत्कार, विविध सामाजिक उपक्रम येणाऱ्या 14 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना टायगर ग्रुप चे अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव प्रसिद्ध अनिकेत भाऊ घुले तथा मराठवाडा अध्यक्ष गौरक्षक उमेश पोखरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
बीड शहरातील नळवंडी नाका परिसरात टायगर ग्रुप महाराष्ट्राचे संपर्क कार्यालय आहे या ठिकाणी 14 सप्टेंबर रोजी राकेश जाधव यांच्या विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अपघात विमा, रक्तदान शिबिर, माता भगिनींचा सत्कार, वृक्षारोपन सह वरिष्ठ व सामाजिक प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार, यासह विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू व गरजवंत लोकांना टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष राकेश जाधव यांच्या हस्ते नेहमीच मदत केली जाते. तानाजी भाऊ जाधव यांच्या आदेशाने कोठूनही कोणाचा कधीही फोन आला त्याला तात्काळ मदत करण्यात टायगर ग्रुप महाराष्ट्र सदा अग्रेसर असते. वाढदिवसानिमित्त राकेश जाधव यांनी विविध सामाजिक उपक्रमांची रेलचेल ठेवली आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी तानाजी भाऊ जाधव यांच्यासह अनिकेत घुले मराठवाडा अध्यक्ष उमेश पोखरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अपघात विमा कवच प्राप्त करण्यासाठी नळवंडी नाका येथील टायगर ग्रुप महाराष्ट्र च्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन टायगर ग्रुप महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या मोबाईल क्रमांकावर आपण आपल्या अपघात विम्याची नोंद करू शकता मोबाईल क्रमांक 9604180090, वीरेंद्र शेळके,तथा श्रीशा उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.