धक्कादायक ! वडिलांनीच मुलीला गळफास देऊन स्वतः घेतला होता गळफास.
दोन दिवसापूर्वी इनामपूर रोड लगत बोराडे यांनी घेतला होता गळफास,आज मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरापासून जवळ असलेल्या इमामपूर रोडलगत असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जयराम बोराडे (रा. भाटसांगवी) नावाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दि.९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोराळे व सहकाऱ्यांनी सदरील तरुणाने आत्महत्या घटनास्थळी धाव घेतली.याची माहिती बोराडे कुटुंबीयास देण्यात आली होती, परंतु बोराडे कुटुंबा कडून माहिती मिळाली की जयराम यांच्या सोबत त्यांचीच ३ वर्षाची मुलगी होती ती बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. बीड ग्रामीण पोलीस बेपत्ता मुलीचा शोध घेत होते.
जयराम बोराडे यांनी आत्महत्या केल्यानंतर सदरील मुलगी आजुबाजुस कुठेच मिळून आली नसल्याने कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ते असल्याची माहिती दिली. त्या अनुषंगाने पोलिसांनी मुलगी कुठे आढळून आल्यास वीड ग्रामीण पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन केले होते.
दोन दिवसानंतर आज दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी रामगड परिसरात मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली असून याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मुलीला जयराम बोराडे यांनी गळफास दिला असा संशय पोलिस व्यक्त करत आहेत.बोराडे यांनी आधी मुलीला गळफास देऊन नंतर त्याने इमामपूर रस्त्यावर जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची माहिती समोर येत आहे.