
परळीत विस्तार अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण मात्र गुल्दस्त्यात
परळी वैजनाथ शहरातील शिवाजीनगर परिसरात बीड पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असणारे विस्तार अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास कळाली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी वैजनाथ शहरातील शिवाजीनगर भागात वास्तव्यास असलेले व बीड पंचायत समिती कार्यालयातील विस्तार अधिकारी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकिस आली आहे. विलास डोगरे असे आत्महत्या ग्रस्त व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्याचे कारण मात्र समजले नाही. विलास डोगरे यांच्या पाश्चत तीन मुली, आई पत्नी, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विलास डोगरे यांनी परळी पंचायत समिती कार्यलया अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचाय मध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा बजवाली आहे. धर्मापुरी , सिरसाळा, कन्हेवाडी ,अशा अनेक गावांत त्यानी चांगले काम करुन दाखवले आहे. विलास डोगरे यांच्या पार्थिवावर परळी तालुक्यातील खामगाव येथे सायंकाळी होणार आहे.