गोदावरीला महापूर पहा ! अनेक गावाचा संपर्क तुटला,मंदिरे पाण्याखाली.
बीड जिल्ह्याला पावसाने झोडपले.

* गोदावरी गंगा आणि सिंदफणा नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला
* सांड चिंचोली शुक्ल तीर्थ लिमगाव सोमनाथडी या गावांना पाण्याचा वेढा
* मोगऱ्याच्या खडकीला पाणी आल्यामुळे पोहनेर मोगरा डाके पिंपरी दिग्रस कोथाळा साळेगाव या गावांचा संपर्क तुटला
माजलगाव(प्रतिनिधी)तुकाराम येवले माजलगाव तालुक्यात दोन-तीन दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सिंदफणा नदी आणि गोदावरी गंगेला महापूर आल्याने अनेक गावांना पाण्याने वेडा टाकल्यामुळे संपर्क तुटला आहे मराठवाड्याचा श्रद्धास्थान असलेल्या गंगामसला येथील मोरेश्वर चे मंदिर पूर्ण पाण्यात गेले आहे तर माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडल्यामुळे सिंदफणा नदी पूर्ण क्षमतेने भरून जात आहे व सांडत चिंचोली गावाला पूर्ण पाण्याने भेटले आहे.
यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे माजलगाव चे धरण ऑगस्ट महिन्यातच 100% भरले होते आणि गेल्या दोन-तीन दिवसापासून संपूर्ण मराठवाड्यातच जोरदार पाऊस सुरू असल्याने जायकवाडीचे दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी नदीमध्ये एक ते दीड लाख शिवसेने पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी भरून वाहत आहे तर माजलगावच्या धरण क्षेत्रामध्ये ही भरपूर पाऊस झाल्यामुळे माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले आहेत त्यामुळे सिंदफणा नदीकाठच्या सांडत चिंचोली गावाला पाण्याने वेढले आहे तर गोदावरी नदीच्या पुरामुळे सोमनाथ अडी शुक्ल तीर्थ लिमगाव मोगरा या गावांना पाण्याने वेढले आहे तर मोगरा येथील खडकीला पाणी आल्यामुळे मोगरा डाके पिंपरी खतगव्हाण पोहनेर साळेगाव कोथळा आदी गावांचा जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाला आहे त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीने सिंदफणा नदी काठावरील शिंपी टाकळी लुखे गाव रोशन पुरी नागडगाव सांडचिंचोली देपेगाव गोविंदपुर मंजरथ या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे तर गोदावरी नदीकाठच्या बोरगाव आबेगाव सोमठाणा सर्वर पिंपळगाव आडोळा सोन्नाथडी गुंज थडी सुरमगाव शुक्ल तीर्थ लिमगाव डाके पिंपरी दिग्रस पोहनेर या गावांना देखील सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे माजलगाव चे तहसीलदार संतोष रुईकर व प्रशासन सतर्क असल्याचे दिसून येत आहे