अंबाजोगाई तालुक्यातील राक्षसवाडी येथील तलाव फुटला ? व्हिडिओ पहा
पावसांच्या रौद्ररूपाने जिल्ह्यात हाहाकार,अनेक गावांना पुराचा धोका.

बीड जिल्ह्याला दिनांक 14 सप्टेंबर रविवार रोजी झालेल्या मुसळधार पावसाने झोडपल्याने जिल्ह्यातील नदी,नाल्या सह अनेक तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
आंबेजोगाई तालुक्यातील सर्वच मंडळात संततधार पाऊस झाल्याने ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून राक्षसवाडी येथील तलाव फुटल्याची माहिती समोर येत आहे.या परिसरातील अनेक गावात पाणी शिरल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. तलावातील मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडल्याने आसपासच्या गावांत पाणी शिरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
🏞️ पुराचा धोका निर्माण झालेली गावे:
बोधेगाव,कावळेवाडी,वाघाळा,भिलेगाव,मलनातपूर,परचुंडी,सेलू,पिंपळगाव,कवडगाव साबळा,कवडगाव घोडा
या गावांना पुराचा गंभीर धोका निर्माण झाला असून प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य हाती घेण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. तलाव फुटीमुळे शेतजमिनी, घरांना मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
👉 नागरिकांनी सावध राहण्याचे तसेच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.