पोलीस ठाण्यातच कायद्याचा भंग ?
पोलिस ठाण्यात दारूबंदी अधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलाकडून दारूच्या बाटल्या केल्या रिकाम्या.

बीड(प्रतिनिधी)दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्याचा मोठा गाजावाजा करणाऱ्या पोलिस व दारूबंदी विभागाचा खरा चेहरा उघड झाला आहे.काही महिन्यापूर्वी पेठ बीड पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त केलेली दारू नष्ट करण्याच्या कारवाईत थेट एका अल्पवयीन मुलाकडून बाटल्या रिकाम्या करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हा प्रकार दारूबंदी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली व पेठ बीड पोलिस ठाण्यात कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेतच कायद्याचा भंग होणे, ही गंभीर बाब असून यामुळे पोलिस व दारूबंदी विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.बाल कामगारांना कामास ठेवले तर त्यावर कारवी केली जाते आता तर दारूबंदी अधिकाऱ्याच्या सक्षम बालकामगारास दारूच्या बाटल्या रिकाम्या केल्या जात आहेत मग आता त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार?
पोलीस ठाण्यातच बालमजुरी करून घेणे हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून समाजाला चुकीचा संदेश देणारे आहे.
या घटनेमुळे दारूबंदी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांचा विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात असून बीड बीड पोलीस ठाण्यातच अशा प्रकारच्या घटना होत असताना पोलीस निरीक्षकांची भूमिका नेमकी काय ? याचा अंदाज यावरून लावू शकतो.
अल्पवयीन मुलाकडून दारू नष्ट करतांना होत असेल तर यातुन समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, याचे देखील भान दारूबंदी अधिकाऱ्यांना व पेठ बीड पोलिसांना राहिले नाही, याचेच आश्चर्य वाटते. दारू नष्ट करण्याच्या प्रक्रियेत एका अल्पवयीन मुलाचा वापर ही बाब अतिशय गंभीर असुन एक अल्पवयीन मुलगा एका पाठोपाठ एक दारूच्या बाटल्या जमीनीवर ओतुन देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सदरील व्हिडीओ देखील सोशल मिडीयात व्हायरल झाला असुन दारूबंदी अधिकाऱ्यांसारख्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून पोलीसांच्या उपस्थितीत असा प्रकार होत असेल तर या प्रकरणात निश्चितच संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी होऊ लागली आहे.