बीड शहरातील अंगणवाड्यात सावळा गोंधळ,बालकांचा खाऊ कोणाच्या घश्यात !
बालविकास अधिकाऱ्यांनी शहरातील अंगणवाड्या तपासणी करावी,अंगणवाड्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे: सोमेश्वर कदम

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील अनेक अंगणवाड्यांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. बालकांना दिला जाणारा खाऊ, पोषण आहार, तसेच गरोदर मातांना मिळणारा हक्काचा आहार हा प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता साठवून ठेवला जात असून बालकांचा व गरोदर मातांच्या आहार कोणाच्या घशात ? असा सवाल मनसेचे सचिव सोमेश्वर कदम यांनी केला आहे.
अंगणवाडी तपासणी दरम्यान समजले की बालकांना नियमितपणे खाऊ दिला जात नाही. राज्यातील एकही बालक कुपोषित होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून बालकांना शालेय पोषण आहार दिला जातो, प्रत्यक्षात मात्र हा आहार त्या बालकापर्यंत पोहोचत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.तसेच अंगणवाडीतील पटसंख्या दिसून येत नाही. तसेच अंगणवाड्याला वेळेचे बंधन देखील नसल्याची बाब समोर आली आहे. अनेक अंगणवाड्या ह्या वेळे आधीच बंदच असल्याची देखील माहिती मिळत आहे.
बालकांना दिला जाणाऱ्या आहारामध्ये चिक्की, राजगिरा लाडू,खिचडी तसेच इतर पौष्टिक खाऊचे साहित्य बालकांना वाटप न होता सेविकांकडून घरी नेले जात असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत.
बीड शहरातील काही अंगणवाड्यामध्ये गरोदर मातांची नोंदणी करण्यास अंगणवाडी सेविका टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर प्रकार देखील समोर आला आहे,याशिवाय गरोदर मातांची नोंदणी वेळेवर न करता, त्यांच्या नावाने मिळणारा शासन पोषण आहार वाटप टाळले जात असल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे. नवजात बालकांना मिळणारी ‘जन्म किट’ देखील काही ठिकाणी वितरित करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. अंगणवाड्यामध्ये पोलिओ डोस देण्याची प्रक्रिया राबवली जाते पोलिओ डोस देताना बालकाचे वजन करणे आवश्यक असून अंगणवाड्यात वजन काटा नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच महिला प्रसूती झाल्यानंतर दिली जाणारी बेबी किट यामध्ये एक बॅग मच्छरदाणी,खेळणी व बाळाचे कपडे यासह इतर साहित्य दिली जात नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत.याकडेही संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
बालकांना दिला जाणारा खाऊ(सुकडी,तांदूळ खिचडी) व भात शिजवून दिला जात नसून तो आहार देखील अंगणवाडी सेवकीच्या घरी जातो.
मातृतत्व वंदन योजना अर्ज करताना अनंत अडचणी येत आहेत:
या प्रकरणावर तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि पालक जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे करणार आहेत. बीड शहरातील सर्व अंगणवाडी ह्या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली करण्यात याव्यात अशी देखील मागणी होत आहे.
बालविकास अधिकाऱ्यांनी शहरातील अंगणवाडी मध्ये गरोदर माताची नोंद टाळाटाळ करणाऱ्या सेविकांची चौकशी करून दोषीं अंगणवाडी सेविकावर कठोर कारवाई करावी व अंगणवाडी सीसीटीव्हीच्या निगराणी खाली कराव्यात म्हणजे अंगणवाडीतील सत्य परिस्थिती समोर येईल अशी मागणी मनसेचे सचिव सोमेश्वर कदम यांनी बीड जिल्हाधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.