बीड नगराध्यक्षाची निवडणुक वंचितची “भीमकन्या” लढवणार !
नगराध्यक्ष पदासाठी पुरुषोत्तम वीर यांनच्या उच्चशिक्षित पत्नी योग्य उमेदवार राहतील.

बीड नगरअध्यक्षपदा साठी पुरुषोत्तम वीर यांच्या पत्नी आम्रपाली वीर यांना ‘वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी देण्याची मागणी.
बीड नगराध्यक्ष पदाची जागा अनुसूचित जाती(SC )एस सी राखीव असल्याने बहुजन वंचित आघाडीचे पुरुषोत्तम वीर यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
बीड नगर परिषदेच्या आगामी नगर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुरुषोत्तम वीर यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी बीडमधील जनतेकडून जोर धरू लागली आहे गेल्या तीस ते 35 वर्षापासून जो बीडचा विकास व्हायला पाहिजे तसा विकास झालेला नाही अनेक ठिकाणी घाणिचे साम्राज्य स्वतंत्र ड्रेन्नेज नाही . पिण्याच्या फुटलेल्या पाईपलाईन मधे नाल्याचे पाणी . रस्त्यावर बाजारपेठा .मोठ मोठे दालन उभावरून त्यात मुताऱ्या होऊ लागल्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे 15 दिवसाला नळाला पाणी . शहरात सिटी बस नाही त्यामुळे शहराचे व्यवस्थापन थांबले अनेक भागात रस्ते नाहीत . शहरात असलेल्या बिंदूसरा नदीच्या मूख्यपूलाला आनेक वर्षापासून कठडे नाहीत.असे अनेक समस्या शहरातील आहेत त्यामुळे बीड शहराच्या विकासाची ज्यांना जान आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळ आसलेल्या पुरुषोत्तम वीर यांच्या पत्नीने नगर अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी, अशी मागणी बीड शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
शहराच्या समस्यांची जाण आहे आणि ते वंचित तसेच मागासलेल्या घटकांना न्याय मिळवून देऊ शकतात. त्यांच्या उमेदवारीमुळे ‘वंचित’ची ताकद वाढेल आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील, असा विश्वास जनतेला वाटत आहे.
या मागणीमुळे आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर साहेब यांनी पुरुषोत्तम वीर यांना संधी द्यावी अशी मागणी शेख रेहान,शेख फरहान,शेख तय्यब शेख,सलमान शेख अरहम शेख शेरु,शेख जहीर,सय्यद ऊबेद,शेख रिजवान यांच्यासह आदींनी केली आहे.