बिबट्याच्या हल्ल्यात तरुण ठार.
रात्री उशिरा सापडला मृतदेह.वनविभागाने तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा.

कडा दि.१२ (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यात डोंगर भागात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थापितेचे वातावर निर्माण झाले आहे. बीड शहरा जवळी वांगी येथील वस्तीत शेळ्याच्या कळपवर हल्ला केल्याने दहा ते बारा शेळ्या ठार झाल्या होत्या त्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण पसरले होते. शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळले होते.वनविभागाला बिबट्याचे गांभीर्य नसून बिबट्याचा शोध लावण्यास वन विभाग अपयशी असल्याचे दिसत आहे.
आष्टी तालुक्यातील बावी देरेवाडी येथील राजू विश्वनाथ गोल्हार (वय ३५) हा रविवारी सायंकाळी आपल्या शेतात गेला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बैल घरी आले मात्र राजू घरी न आल्याने कुटुंबातील व्यक्तिंनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. राजू गोल्हार यांच्या जवळील टॉवेल रक्ताने माखलेल्या अवस्थेत शेतात आढळून आल्याने बिबट्याने हल्ला केल्याचा संशय आहे. जवळपास २०० ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत राजूचा शोध घेत होते. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी देखील दाखल झाले होते. सर्व जण मिळून डोंगरदऱ्यात त्याचा शोध घेत होते असे सरपंच नवनाथ गर्जे यांनी सांगितले. दरम्यान रात्री ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान राजूचा मृतदेह मिळून आला. या प्रकाराने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.