यश ढाका खून प्रकरणी चौथा आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
पोलिस उपअधीक्षक पूजा पवार यांनी केले जेरबंद.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरात माने कॉम्प्लेक्स परिसरात २५ सप्टेंबर रोजी रात्री ८:३० वाजता पत्रकार पुत्र यश ढाका याचा टोळक्यांनी हल्ला करत चाकू भोकसून हत्या करण्यात आली होती.
बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स या गजबजलेल्या ठिकाणी लोकांसमोर हत्या करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.यश ढाकाचा हत्या करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होते.या हत्या प्रकरणात तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतले होते.
यातील चौथा आरोपी निखिल घोडके रा.घोडका राजुरी याला मंगळवारी मध्यरात्री बीड पोलीस उपाधीक्षक पूजा पवार याला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास घोडका राजुरी येथे स्वतः डीवायएसपी पूजा पवार यांनी सापळा रचून निखिल घोडके याला पकडले. या कारवाईनंतर पोलिसांच्या ताब्यात या प्रकरणातील एकूण चार आरोपी आले आहेत.
यशच्या खुनानंतर पोलिसांनी तपास चार आरोपींना ताब्यात घेतले यातील तीन आरोपी बीड जिल्हा कारागृहात आहेत.
निखिल घोडके कडून आणखी काही माहिती मिळते का?या हत्या मध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का?याचा तपास बीड पोलीस अधीक्षक पूजा पवार करत आहेत.