अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसल्याने एक ठार.
आठ ते दहा जखमींना बीड शहरातील रुग्णालयात उपचार सुरू.

बीड तालुक्यातील पाली येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी सुरू असतानाच भरधाव वेगाने येणारा पिकअपला चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने पिकअप अंत्यविधी कार्यक्रमात घुसल्याने एक जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर असून सात ते आठ जण जखमी झाले आहे. जखमींवर बीड शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पिकप ने धडक दिल्यानंतर पुढे जाऊन पलटी झाला त्या पिकप मध्ये कामगार जखमी झाले असून त्यांना बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामधील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
पाली परिसरातील स्मशानभूमीत आज (ता. १५) सायंकाळी स्वर्गीय आसराबाई किसनराव नवले यांचा अंत्यविधी सुरू होता. ट्रकने पिकपला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पिकप वरील ताबा सुटून अंत्यविधी कार्यक्रमात घुसला.
पिकअप क्रमांक MH 13 AN 9930 ला मागून धडक दिल्याने चालकाचे संतुलन सुटल्यामुळे हा पिकअप अंत्यविधी मध्ये घुसला यात संभाजी विठ्ठलराव जाधव (रा. रोळसगाव वय 50) हे मयत झाले व मसू जगताप करचुंडी वय 45 वर्ष व आश्रुबा शिंदे हे जखमी असून यांच्यासह आठ ते दहा जण अपघातात जखमी झाले आहेत. अंत्यविधी व पिकप मधील नागरिक जखमी झाले असून जखमींना तात्काळ बीड मधील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.