DYSP पूजा पवार मॅडम यांनच्या धडक कारवाया.
चक्री,लॉटरीवर कारवाई,10 जुगाऱ्यासह 508260 चा मुद्देमाल जप्त.

बीड- पूजा पवार यांनी बीड पोलीस उपअधिक्षक पदाचा पदभार घेताच शहरात अवैध धंद्यावर धडक कारवाई करण्यात आली.
बीड बसस्थानकाच्या समोर सुरु असलेल्या तब्बल तीन ऑनलाईन जुगाऱ्यावर कारवाई करून डीवायएसपी पूजा पवार यांनी पहिला दणका दिला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरणाऱ्या या जुगाऱ्यांवर धडक कारवाया केल्याने दोन नंबर धंदे करणारात खळबळ उडाली आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या अंडा ऑम्लेट च्या गाड्याशेजारी प्ले बुक नावाचा ऑनलाईन जुगार सुरु होता. याची माहिती मिळाल्यानंतर डीवायएसपी पूजा पवार यांनी आपल्या टीमसह कारवाई केली. तर दुसरी कारवाई इथून जवळच असलेल्या मानसी मोबाईल शॉपीच्या तिथे देखील करण्यात आली. तर तिसरी कारवाई बसस्थानक समोर भाजी मंडी रोड,लाईफलाईन हॉस्पिटल तळघराखाली असलेल्या लॉटरीवर करण्यात आली आहे. या कारवायात ५८२६० रुपयाची नगदी रोकड ताब्यात घेण्यात आली. डीवायएसपी यांनाच आक्रमक व्हावे लागले आहे. पोलिसांच्या कारवाईत 10 जणांना ताब्यात घेण्यात आले.
ही: कारवाई पोलीस उपाधीक्षक पूजा पवार मॅडम,कुलदीप औसरमल,सचिन आगलावे,अनिल घटमल ,अनंत गिरी यांनी केली.
पोलिस उपाधीक्षक पूजा पवार यांच्या धडक कारवाईने अवैधधंदे करणारात खळबळ उडाली,कारवाईची बातमी समजताच अनेकांनी आपले धंदे बंद केले. पवार मॅडम यांच्या धडक करवाईचे स्वागत होत असून बीड शहर व ग्रामीण भागातील मटका, गुटखा, चक्री, पत्त्यांचे क्लब,हॉटेल,धाब्यावर अवैध दारू यासह इतर अवैध धंद्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.