अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पोलिसांच्या ताब्यात
पंचवीस लाखाचा मुद्देमाल जप्त,बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड, दि. 16 ऑक्टोबर आज रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी एका टिप्परमधून तब्बल पाच ब्रास इतकी वाळू जप्त केली असून या कारवाईत एकूण ₹25 लाख 25 हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
सदर टिप्पर चालकाचे नाव शिराज सालार शेख (वय 35 वर्षे, रा. तैयब नगर, गेवराई) असे असून, वाहनाचा मालक विपुल मस्के (रा. पालवण, ता. जि. बीड) असा आहे. या दोघांविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर ,उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास राठोड, पोलीस अंमलदार अश्फाक सय्यद, मनोज परजणे व नितीन वडमारे यांनी केली.
या कारवाईमुळे बीड ग्रामीण परिसरातील अवैध वाळू वाहतुकीवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.