वेव्हज 2025 जागतिक परिषदेच्या अनुसंघाने विशेष कार्यक्रम -अंबाजोगाई

अंबाजोगाई प्रतिनिधी दि ४मे
सर्वच रसिक श्रीते,अंबाजोगाई कराना
कळविण्यात आनंद होतो की, *महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई* आयोजित *WAVES 2024* जागतिक परिषदेच्या अनुषंगाने
*ध्वनी – चित्र – रंजन*
हा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी तसेच महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्यासाठी आज दि. ०४ मे २०२५ रविवार रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता शहरातील *स्व. विलासरावजी देशमुख सांस्कृतिक सभागृह* नगरपरिषद अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. दीड तासाच्या या कार्यक्रमांमध्ये आपणास पोवाडा, जुगलबंदी, महाराष्ट्राची लोकवाद्य, तसेच लोक नृत्य अशी एकंदरच सांस्कृतिक मेजवानी अनुभवण्यास मिळणार आहे. तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे कळविण्यात आले आहे