शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या गित्तेला देखील बेदम मारहाण.
त्या मातेफिरूचे मारहाण करतानाचे आणखी दोन व्हिडिओ व्हायरल.

परळी तालुक्यातील लिंबोटी या गावातील शिवराज दिवटे या तरुणाला अडवून परळी जवळी एका निर्जनस्थळी घेऊन जात दहा ते पंधरा तरुणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण करण्यात आली होती.शिवराज ला मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट पसरली व मारहाण करणाऱ्या टोळीला कठोर शासन करत मकोका लावण्यात यावा अशी मागणी केली होती.मारहाण प्रकरणात मारहाण करणाऱ्या टोळी विरुद्ध परळी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ७ आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे.
शिवराज दिवटे हा मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार घेत असून खासदार बजरंग सोनवणे,मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील,आमदार धनंजय मुंडे,आमदार सुरेश धस, दीपक केदार सह लोकप्रतिनिधी व नेत्यांनी रुग्णालयात जाऊन शिवराजची भेट घेतली.या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असतांना आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.ज्या तरुणाने दिवटेला मारहाण केली त्याच तरुणाला लोकांनी पकडून मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये मारहाण करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत परळीतील संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. या मारहाण करणाऱ्या तरुणाचे आणखी दोन व्हिडिओ सोशल मीडियावर वायरस झाले आहेत.