दोन बालविवाह रोखले.
सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे व पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेने बालविवाह रोखला.

बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात खेडेगाव मध्ये मोठ्या प्रमाणावर बाल विवाह असून याकडे पोलीस सामाजिक कार्यकर्ते, प्रशासन व बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी माहिती मिळाल्यावर सदरील गावात जाऊन अनेक बालविवाह रोखले आहेत. मागील महिन्यात बीड तालुक्यातील शिवनी गावात बालविवाह रोखलेचे प्रकरण ताजे असतानाच आज बीड शहरा नजीक असलेल्या पागरबावडी ता. जी.बीड हद्दीतील दोन बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली असता अवैध मानवी वाहतूक कक्षाच्या प्रमुख वर्ष व्हगाडे, तत्वशील कांबळे अधीकार मित्र जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड,ग्रामसेवक मुकेश भस्मारे ग्रामसेवक सपकाळ आदी पांगर बावडी येथे जाऊन बालविवाह थांबवला.
दोन्ही मुलीचे वय 16 वर्ष तर दोन्ही मुलांचे वय 19 वर्ष असे असल्याने दोघांचेही वय विवाहासाठी अयोग्य आहे तसेच हा कायद्याने बालविवाह असून आपण त्या नंतर ही जर आपण बालविवाह केला तर आपल्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो तसेच मुला मुलींचे आई-वडील व नातेवाईक यांचे समुपदेशन करण्यात आले व मुलींचे शिक्षण पूर्ण सुरू ठेवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.बाल वयात लग्न केल्यास शरीरावर होणारे गंभीर परिणाम, लहान वयात पडणाऱ्या जबाबदाऱ्या, कुपोषित अपत्य, शिक्षणाचे महत्त्व अशा सर्व समुपदेशन करून मुलीचा विवाह अठरा वर्षे झाल्याशिवाय लावून देणार नाही, असे हमीपत्र घेवून सदरचे दोन्ही बालविवाह रोखण्यात आले, ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली AHTU पथक प्रमुख API वर्षा व्हगाडे, पोलीस अंमलदार अशोक शिंदे, प्रदीप येवले, मनीषा खरमाटे, रूपाली टोणे, यांचेसह बालविवाह अधिकारी ग्रामसेवक एस. बी. सपकाळ, व सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी केली.
बालविवाह होत असल्यास आमच्याशी संपर्क करा. तत्त्वशील कांबळे.(सामाजिक कार्यकर्ते)
बीड जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी गावामध्ये जर बालविवाह होत असतील तर आमच्याशी व पोलीस प्रशासनाची संपर्क करावा असे आवाहन तत्त्वशील कांबळे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
संपर्क..9423470437