संपादक शेख कामरान यांना ‘निर्भीड पत्रकारिता पुरस्कार जाहीर.
रविवारी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहावे.

बीड.पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि निर्भीड पत्रकारितेची दखल घेऊन व्यक्तिमत्वाला साजेल असा निर्भीड पत्रकारिता पुरस्कार घोषित करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण रविवारी (दि.१५) दुपारी ३ वाजता एका शानदार कार्यक्रमात सर सय्यद स्कूल जम जम कॉलनी येथे वितरण करण्यात येणार आहे.
शहरातील सामाजिक उपक्रमात अग्रस्थानी असलेल्या अल-खैर मल्टीपर्पज फाऊंडेशन,बीड कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. यासाठी अनेक उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये दैनिक किसानची मागील चार वर्षांची वाटचाल आणि जपलेला निर्भीडपणा, तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लेखणी झिजवणारे संपादक शेख कामरान राजू यांना निर्भीड पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना साजेल असा असून, चार वर्षात सामान्यांसाठी किसानने कधीच तडजोड केली नाही. या पुरस्काराचे वितरण रविवारी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि गौरव सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी नागरीक,पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अल-खैरचे फाउंडेशनचे इनामदार अझरुद्दीन मुजीब, मोमीन रजियोद्दिन सलीभोद्दिन,अमिरखान अय्युबखान यांनी केले आहे.