त्या प्राध्यापकाच्या तोंडाला काळे फासून गाढवावरून धिंड काढणार..ॲड.स्वप्निल गलधर
त्या नराधमाला फाशी द्या.

बीड शहरातील उमा करण कोचिंग क्लासेस मधील प्रा.विजय पवार व प्रशांत खाटोकर या दोघांनी क्लासेस मधीलच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्या दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होताच ते दोघेही फरार झाले असून पोलिसांची चार पथके शोध घेत आहेत.
या निंदनीय प्रकरणाचे सर्व स्तरातून निषेध होत असून पालकांच्या व सामाजिक कार्यकर्त्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.बीड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून शिक्षकी पेशाला काळिंबा फासणाऱ्या त्या नराधम प्राध्यापकाची गाढवावरून धिंड काढणार असल्याचे सांगितले.तसेच त्या क्लास मधील इतर मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करत मुलींनी घाबरून न जाता पोलिस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले.